Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Arun Dike
Publication: Rajhans Prakashan
Category: विज्ञान-पर्यावरण
Qty:
श्रीपाद अच्युत दाभोलकर म्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशी थेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ. दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही; तर खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीत राहणाऱ्या निरक्षर शेतकऱ्यापासून प्रयोगशील, पदवीधर शेतीतज्ज्ञापर्यंत साऱ्यांशी मनमोकळा संवाद साधायचे. वरकरणी अद्भुत वाटणाऱ्या कल्पना शास्त्रशुध्द ज्ञानाच्या मदतीनं वास्तवात कशा आणायच्या, हे प्रात्यक्षिकासहित सप्रयोग सिध्द करणारे दाभोलकर प्रत्येकाला नवी दृष्टी द्यायचे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक पानाफुलाशी, फळापिकाशी, झाडवेलीशी अन् अर्थात माणसाशीही घट्ट नातं जोडणारा दाभोलकरांचा हृदयसंवाद.