Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ | संत-साहित्य | कलाकौशल्य | भाषाविषयक | संपादित | सामाजिक | व्यक्तिमत्व विकास | व्यवसाय |
लोक माझे सांगाती (नवीन आवृत्ती) - Lok Maze Sangati (New Edition)

Author: Sharad Pawar

Publication: Rajhans Prakashan

View Details

अमावस्येचा पूर्णचंद्र - Amavasyecha Purnchandra

Author: Shrikant Lagu

Publication: Rohan Prakashan

Category: कथासंग्रह

125

Qty:




Note:
- Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra.
- The availability of a book may vary depending upon the stock.
- The price of the book may vary according to the edition.
Description

अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा-विदेशातील विविध छटांमधील ग्रहणं बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं- वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी. त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरशः झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाऊन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्‍भुत नाट्य. ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं पण मन मात्र भरत नाही. हुबळी, डायमंड हार्बर, कच्छ, झांबिया, द. आफ्रिका, टर्की, चीन, रामेश्वरम्‌ अशा देश-विदेशातील अनेक ठिकाणी त्यांनी खग्रास सूर्यग्रहणाचा जणू पाठलागच केला! ते स्वतः खगोलशास्त्रज्ञ नाहीत किंवा अंतराळशास्त्रज्ञही नाहीत. तरीही एखाद्या निरागस पण जिज्ञासू वृत्तीच्या मुलाप्रमाणे ते ग्रहणाचं रोमांचपूर्ण वर्णन करतात. ग्रहणाच्या पहिल्या स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंतच्या काळाचं वर्णन वाचताना वाचकाला स्वतः ग्रहण अनुभवत असल्याचा आनंद देऊन जातात. लागू देश-विदेशात भरपूर फिरले, मात्र नेहमीच्या पठडीतील पर्यटनासाठी म्हणून ते फिरले नाहीत. त्यांची भटकंती झाली ती कधी जलतरणस्पर्धेच्या निमित्ताने तर कधी नाट्यप्रयोगांसाठी, कधी कैलास-मानससरोवराची प्रदक्षिणा करायला, कधी एव्हरेस्ट बेसकॅंप सर करण्यासाठी तर कधी अद्‍भुत शांततेने आणि केवळ बर्फाने आच्छादलेला सातवा खंड-‘अंटार्क्टिका’ अनुभवण्यासाठी! मात्र या पुस्तकातील भटकंती आहे ती फक्त आणि फक्त ग्रहणं बघण्यासाठीची...

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल