Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Kirti Parchure
Publication: Diamond Publications
Category: लेख
Qty:
ऍल लहानपणापासूनच खूप खोडकर होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. एकदा तो बदकांसाठी आणि कोंबड्यांसाठी केलेल्या घरामागच्या खुराड्यात असाच काहीतरी उद्योग करत बसला होता. त्याच्या बहिणीला तो सापडला, तेव्हा त्याचे सगळे कपडे आणि पाय पिवळे झाले होते. ‘‘कपड्यांना काय झालं?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘बदकं किंवा कोंबड्या अंड्यांवर बसल्या, तर त्यांच्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात, पण मी बसल्यावर मात्र अंडी फुटली! असं का झालं काय माहीत !’’ सतत कुतूहलाने घेरलेला हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन! एडिसन अक्षरशः अथकपणे आयुष्यभर स्वतःच्या कुतूहलाचा चिकाटीने पाठलाग करत राहिला. विजेच्या दिव्याचा क्रांतिकारक शोध तर त्याने लावलाच, पण सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील असे इतरही अनेक शोध त्याने लावले. कठीण परिस्थितीमुळे कधीही न खचलेल्या आणि संकटाला कायम संधी मानणार्या या भन्नाट माणसाचं असामान्य चरित्र आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे; आणि त्याचं ध्येयासाठीचं झपाटलेपण आपल्याला निश्चित स्तिमित करणार आहे !