Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Dr.Pandit Vidyasagar
Publication: Diamond Publications
Category: विज्ञान-पर्यावरण / कादंबरी
Qty:
मंगळग्रहावर सजीवांना आणि विशेषतः मानवी समूहांना वास्तव्य करता यावे यास्तही अनुकूल पर्यावरणाची गरज असल्यामुळे चार भारतीय शास्त्रज्ञ मंगळावर एक मोहीम राबवतात. या मोहिमेंतर्गत ते येणाऱ्या काळातील मानवी समाजाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देणारा महत्वाकांशी प्रकल्प राबवित आहेत. हा संशोधन प्रकल्प राबवताना कोणकोणत्या अज्ञान आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते या रोमांचक विषयावर ‘धूमयान’ ही कादंबरी आधारलेली आहे. कादंबरीत ज्या आव्हानात्मक घटना घडतात त्यामध्ये एक नाट्य दडलेले पाहायला मिळते. पुढे काय होणार याची जिज्ञासा वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते. वाचक तन्मयतेने कादंबरी वाचनात गढून जातो. हे लेखकाच्या लेखन शैलीचे यश आहे. उद्या मानव मंगळावर मानव वस्तीला गेला तर आश्चर्य वाटू नये.असे कधी नया कधी घडणारच आहे. ही केवळ कवि कल्पना उरलेली कधी काळी मानवी जीवन मंगळावर आकाराला आले तर त्या वेळी डॉ. पंडित विद्यासागर या लेखकाचे द्रष्टेपण तेव्हाच्या मानवी समाजाला नक्कीच कळू शकेल. आपल्या प्रतिभेची विलक्षण झेप डॉ. पंडित विद्यासागर यांनी ‘धूमयान’ या कादंबरीत अधोरेखित केली आहे.